Wednesday, April 29, 2020

सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णाताई रामतीर्थकर यांचे निधन


🙏भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
👏👏👏👏👏👏👏👏
💐💐💐💐💐💐💐💐 
   
    सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन
सोलापूर - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचे  मंगळवारी (29 एप्रिल) सकाळी 11.45 वाजता अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.  पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्या 65 वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत.
मुलाचं शिक्षणपूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच 1996 मध्ये अपुरे शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचं वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या. 2001 पासून त्या सामाजिक कार्यात आहेत. 2008 पासून ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदार्‍या’ या विषयांवर त्यांनी तीन हजाराहून अधिक भाषणं दिली आहेत. तुटणारी घरं वाचली पाहिजेत आणि लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवलं पाहिजे, या भावनेने त्या कार्य करत होत्या.
महिन्यातून 26 ते 28 दिवस एसटी बसने प्रवास करून व्याख्याने देणार्‍या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांच्या भूमिकेवरून अनेकदा वादही झाले. सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी महिला आणि इतर विषयावर त्यांनीट पुष्कळ स्तंभलेखन केले. आपले संपूर्ण मानधन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील पारधी मुलांच्या वसतीगृहासाठी देऊन अनेक वर्षे त्यांनी तेथील आश्रमशाळा उभी केली.

             मी आमच्या ओबीसी संघटनेकडुन महाराष्र्ट रत्न पुरस्कारासाठी आंमञित करावयास गेले होते, म्हणाल्या सर्वजण आम्हालाच पुरस्कार देता, दुसर्यांनाही संधी द्या.
त्यांच्या आत्म्यांस शांती लाभो.🙏
👏👏👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐💐
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - 
: भाषण संग्रह :

अ‍ॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांची दोन  भाषणे पुढे दिली आहेत. एकवेळ अवश्य ऐकावी आणि कायमस्वरूपी संग्रहित करून ठेवावित अशी भाषणे - पुढील Link ला Click करुन तुम्ही ते भाषण Download  करू शकता. 

१.  अ‍ॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर भाषण 01 


२.  अ‍ॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर भाषण 02 


त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

Tuesday, May 7, 2019

Trial Test

My Quiz

चूक की बरोबर ते ओळखा
  1. 8 ही पूर्ण वर्ग संख्या आहे.

  2. चूक
    बरोबर

  3. 0 ही नैसर्गिक संख्या आहे.

  4. बरोबर
    चूक

  5. 6.5 x 6.5 = 42.25

  6. बरोबर
    चूक

  7. सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आहेत.

  8. चूक
    बरोबर

  9. एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात.

  10. चूक
    बरोबर
Thanks for Quiz..!

Saturday, May 4, 2019

‘कोणते झाड कुठे लावले पाहिजे?’

‘कोणते झाड कुठे लावले पाहिजे?’

मा. मारुती चितमपल्ली, जेष्ठ निसर्गतज्ञ, यांनी ‘कोणते झाड कुठे लावले पाहिजे?’ यावर आपल्यासाठी चार्ट तयार केला आहे. ही अतिशय दुर्मिळ माहिती आहे.